Freelancing
- Golgappastory
- Mar 7, 2020
- 3 min read

आज आपण ज्या विषयावर चर्चा करणार आहोत तो खूपच इंटरेस्टिंग आहे बरे का... म्हणजे असा कुणी आहे का ज्याला पैसे कमवाचे नाहीयेत ?? किंवा पैसेच नकोत बाबा मला.. असा कोणी या जगात अस्तित्वात असेल असे मला तर नाही बाबा वाटत..........
पण असा कुणी आहे का कि ज्याला पैसे तर कमवायचे आहेत पण काम करण्यासाठी कुठे जायचे नाहीये. म्हणजे ऑफिसमध्ये किंवा कंपनीमध्ये... नक्कीच आपल्या सगळ्यांनाच असे वाटते कि मला खूप पैसे मिळावे पण त्यासाठी काही कुठे जायला नको बाबा..
तर असा होऊ शकते.. नक्कीच होऊ शकते..आणि त्यासाठी लागणारी सगळी माहिती मी आज तुम्हाला इथे सांगणार आहे.
पण त्याआधी मला तुम्हाला एक सांगायचे आहे कि कोणतेही काम केल्याशिवाय तुम्हाला पैसे मिळणार नाहीयेत.. म्हणजे काहीच न करता फ्री मध्ये पैसे असा याचा अर्थ नाहीये..
फ्रीलांसिन्ग म्हणजे काय ?
कुठूनपण, कधीपण, कसेपण काम करणे..पण काम करणे. जेथे तुम्हाला जागेच बंधन नाही ना वेळेचे बंधन नाही. तुम्हाला फक्त काही काम करून द्यायचे आहेत आणि त्या बदल्यात पैसे घ्यायचे आहे. तेपण कुठेही फिजिकली न जाता तुम्ही जिथे आहेत तिथूनच तुम्हाला डिजिटली काम करायचा आहे. पण आता प्रश्न हा आहे कि हे करायचा कसा?? आणि कोण देणार आहे आपल्याला बसल्या बसल्या काम??
तर देणार आहे. फक्त तुमच्याकडे लॅपटॉप किंवा डेक्सटॉप हवा आणि इंटरनेट कनेकशन, thats it you are all set to work.
फ्रीलांसिन्ग कामे देणाऱ्या अनेक वेबसाइट आहेत ज्या जागतिक पातळीवर काम करतात. काय करतात या वेबसाइट? तर छोटे मोठे काम असेल ते या वेबसाइट द्वारे करून घेतले जाते. म्हणजे या वेबसाइट दोन भागांमध्ये विभागलेल्या असतात काम देणारे आणि काम करणारे. इतका सोपा आहे. एक उदाहरणाद्वारे हे आपण समजून घेऊ.
अमेरिकेमध्ये राहणाऱ्या जॉन ला त्याच्या कंपनीसाठी एक वेबसाइट बनवून हवी आहे. त्यासाठी त्याने abcxyx.com या वेबसाइट वर त्याने त्याचे नाव रजिस्टर केले. त्यानंतर त्याने वेबसाइट बनवून हवी आहे असा प्रोजेक्ट संपूर्ण माहितीसह आणि त्याच्या बजेट सह पोस्ट केला. आता abcxyx.कॉम या वेबसाइट वर आधीपासून रजिस्टर असणाऱ्या सगळ्या फ्रीलान्सर्सना हा प्रोजेक्ट दिसला. त्यामध्ये भारतात राहणाऱ्या पूजा असा विश्वास होता कि आपण हा प्रोजेक्ट पुनः करू शकतो म्हणून तिने जॉन च्या प्रोजेक्ट साठी बीड केले म्हणजेच अप्लाय केले आणि त्यात तिलाच हा प्रोजेक्ट का मिळावा असे प्रोपोसलं लिहिले.. पूजासारख्याच बाकी अनेक लोकांना विश्वास होता म्हणून त्यांनीपण तिथे जॉन च्या प्रोजेक्ट ला बीड केला. सगळ्या लोकांचे प्रोपोसलं वाचून जॉन ला असे वाटले कि पूजा हे काम करू शकते म्हणून त्याने पूजाला abcxyx.com वरूनच संपर्क केला आणि त्याच्या वेबसाईट ची पुढची सगळी माहिती दिली त्यानंतर पूजाने काम सुरु करून ८ दिवसांध्ये ते काम करून जॉन ला सोपवले. मग जॉन ने काम संपूर्ण झाला आहे याची खात्री करून तिला abcxyx.com वरूनच ठरल्याप्रमाणे पैसे दिले ..
बस तर मग आता तुम्हाला पण पूजाप्रमाणे या वेबसाइट वरती तुमचे नाव रजिस्टर करायचे आहे आणि काम शोधायचे आहे. हान पण पहिले काम मिळायला थोडा वेळ मात्र लागणार आहे. पण एकदा तुम्ही सेट झालात कि सगळं काम तुमचा. फक्त रजिस्टर करताना तुम्हाला तुमच्या स्किल्स टाकायच्या आहेत आणि तुम्हाला जमणारे काम करायचे आहे. यावर डेटा एन्ट्री, व्हॉइस रेकॉर्डिंग्स, टायपिंग पासून तर मोबाइलला अँप डेव्हलोपमेंट, फोटो एडिटिंग, असे असंख्य काम आहेत. तुम्हाला जे जमेल आणि आवडेल ते करा.
पैसे मिळतात का????
स्गलूट महत्वाचे म्हणजे फ्रीलांसिन्ग म्हणजे एखादे अँप डाउनलोड करून त्यावरून गमे खेळून मिळणारे पैसे नाहीत. हे म्हणजे प्रत्यक्ष काम करून मिळालेले पैसे आहेत. जेव्हा जॉन प्रोजेक्ट पोस्ट करतो तेव्हा त्याला त्याचे जेपन बजेट आहे तेवढी रक्कम abcxyx.com च्या वॉल्लेट्मधे ऍड करावी लागते, मग जेव्हा तो प्रोजेक्ट पूजा ला मिळतो तेव्हा ती रक्कम तिच्यासाठी जॉन कडून बुक होते आणि जेव्हा पूजा प्रोजेक्ट पूर्ण करते तेव्हा ती रक्कम तिच्या abcxyx.कॉम च्या वॉलेटमध्ये जमा होते आणि २ - ३ दिवसांच्या आत तिच्या बँकेमध्ये. इतका हे सगळं सोपा आणि सुरक्षित आहे. त्यामुळे जर तुम्ही काम करत असाल तर निश्चितच पैसे मिळणार आहेत. पण एखादा क्लायंट तुम्हाला आधी पैसे भर आणि मग काम देतो असे काही सांगत असेल तर मात्र त्या प्रोजेक्ट कडे दुर्लक्ष करा.
फ्रीलांसिन्ग वेबसाइट
आज आपल्या इंटरनेटच्या युगामध्ये असे काम देणाऱ्या अनेक वेबसाइट उपलब्ध आहेत आणि त्यातल्या ९०% सुरक्षित आहेत. यामध्ये सर्वात पहिल्या क्रमांकावर आहे ती म्हणजे upwork.com मग येतात freelancer.com , truelancer.com , guru , peopleperhour अशा अनेक वेबसाइट आज उपलब्ध आहेत. तर मग जर तुम्ही गृहिणी असाल आणि काही स्वतःचे काही करू इच्छित असाल, विद्यार्थी किंवा नोकरीच्या शोधात असाल तर कृपया एकदा या फ्रीलांसिन्ग चा विचार करा आणि आपले आयुष्य स्वतः घडवा. हा सर्व आमचा स्वतःचा अनुभव आहे आणि आजपपर्यंत आम्ही १.५ लाख रुपये मागील ६ महिन्यामध्ये या वेबसाइट द्वारे मिळवले आहेत आणि तुम्हीपण मिळवावे हे आशा.
तुम्हाला फ्रीलांसिन्ग बद्दल काहीही अधिक माहिती हवी असल्यास निसंकोच पणे आम्हाला कंमेंट करा. आम्हीओ सदैव आपल्याला मदतीला तयार असू.
Comments