top of page

कलिंगडाची माहिती आणि उपयोग

  • Writer: GolgappaStory
    GolgappaStory
  • Mar 4, 2020
  • 2 min read

Updated: Mar 7, 2020

कलिंगड हे एक असे फळ आहे कि ज्याबद्दल कुणाला माहिती नाही असा कुणी नाही, कलिंगड किंवा टरबूज हे एक अत्यंत प्रसिद्ध फळ आहे। साधारणपणे उन्हाळ्यामध्ये मिळणारे हे फळ अतिशय गोड असते। याला बाहेरून हिरव्या रंगाचे कठीण आवरण असते आणि आतमध्ये लाल रंगाचा रसरशीत गर।।।।। आहाहा वर्णन ऐकून तर तोंडाला पाणीच सुटले आहे।

कलिंगडाचे शास्त्रीय नाव सिट्रिलस लॅनॅटस असे आहे, मराठी मध्ये त्याला कलिंगड किंवा टरबूज असेपण म्हणतात तर इंग्लिश मध्ये वॉटरमेलॉन असे म्हणतात। हिंदीमध्ये टरबूज, कोकणी मध्ये बचन्ग आणि संस्कृत मध्ये कलिन्द असे पण म्हणतात।

कलिंगडामध्ये काळ्या रंगाच्या बिया देखील असतात, खाताना आपल्याला या बियांची खास काळजी घ्यावी लागते। या बिया पोटात गेल्या तर पोटामधून टरबूजचे झाड येईल अशी भीती आम्हाला वाटायची आणि मग मोठे झाल्यावर कळले कि असे काही नसते।




साधारणपणे उन्हाळ्याच्या सुरवातीला हे टरबूज बाजारामध्ये येते. रस्त्यावरती अनेक हातगाड्यांवर हे कापून किंवा सुंफदार कलाकृती करून ठेवलेले असते, त्याचा लाल चुटुक रंग बघून तुम्हाला ते घ्यावे नाही वाटले तरच नवल.परंतु बऱ्याचदा असे होते कि आपण या लालचाने टरबूज विकत घेतो आणि घरी गेल्यावर मात्र आपले टरबूज अगदी पांढरे आणि अगोड निघते. असे होऊ नये असे वाटत असेल तर टरबूज विकत घेताना त्याच्या आवरणावर हलकी थाप मारून बघावे, पिकलेल्या आणि गोड रसरशीत असणाऱ्या तारबुजामधून पाणी भरलेल्या बॉल मधून यावे तसे कंपने निघतात.टरबूज घरी घेऊन गेल्यानंतर लगेच खाऊ नये कारण ते उन्हामध्ये ठेवली असते आणि त्यामुळे ते गरम झालेले असतात. असे म्हणतात कि टरबूज घरी आणल्यानंतर पिण्याच्या पाण्याच्या मधाखाली ठेवावे जेणेकरून ते नैसर्गिक पण थंड होईल. आमच्या गावाला मार्च महिन्यामध्ये भरणाऱ्या यात्रेत तर टरबूजाच्या फ्रुट प्लेट्स सुद्धा असतात त्यावर आम्ही लहानपणी यथेच्छ ताव मारायचो.


बऱ्याच लोकांना हे ठाऊक नसेल कि टरबूज हे कोणत्याही झाडाला येत नाही तर ते एका नाजूक अशा वेलीवर येत असते. अवधी नाजूक वेळ या अशा जड तारबुजांचे वजन कसे झेलते हे त्या देवालाच ठाऊक. टरबूजाच्या वाढीसाठी अत्यंत अल्प पाणी लागते, मुरबाड, ओबडधोबड आणि रुक्ष जमिनीवर सुद्धा टरबुजाची पीक घेतले जाऊ शकते. टरबूजाच्या बिया वापरून याची लागवड केली जाते.


टरबूज खाण्याचे फायदे

- यामध्ये मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन सी आणि ए असतात.

- टरबूजमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी असते त्यामुळे उन्हाळ्यामध्ये टरबूज खाल्याने शरीरातील पाण्याची पातळी कायम राखण्यात मदत होते. आणि डिहायड्रेशन सारखे प्रॉब्लेम होत नाहीत.

- टरबूजमध्ये यामधील पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि एमिनो अँसिड तत्त्व असतात जे ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवण्यासाठी मदत करतात.

- टरबूज हे वजन नियंत्रण करण्यात मदत करतात डाएटिंग करणाऱ्या लोकांसाठी टरबूज एक उत्तम पर्याय आहे.

- नियमित टरबूज सेवनाने किडनी स्वस्थ राहते तसेच किडनी स्टोन निघून जाण्यास मदत होते.

- टरबूजाच्या बियांमध्ये देखील औषधी तत्व असतात त्यामुळे या बिया वाळवून किंवा भाजून त्यावरील काळ्या रंगाचे आवरण काढून नाश्त्यामध्ये खावे.

- टरबूजमध्ये मुबलक प्रमाणात पोटॅशिअम असते आणि प्रत्येक व्यक्तीला दिवसाला ३,५१0 मिलीग्रॅम पोटॅशियम ची आवशकता असते. टरबूज हे गरज पूर्ण करू शकते.

- यामध्ये बीटा-कॅरोटीन आणि व्हिटॅमिन 'ए' अधिक प्रमाणात असतात त्यामुळे रातांधळेपणा आणि मोतीबिंदू सारखे आजार दूर राहू शकतात.


टरबूज हे अतिशय गुणकारी फळ आहे आणि त्याचे नियमित सेवन उन्हाळ्यात करणे फायदेशीर असते. परंतु यामध्ये पाण्याचे प्रमाण अधिक असते त्यामुळे अतिसेवनामुळे वारंवार लघवीचा त्रास होऊ शकतो. तसेच गर्भवती स्त्रियांसाठी टरबूज खाणे योग्य नाही अशी एक कथा आहे तरी आपण गर्भवती असाल तर डॉक्टरांकडून यावरील सल्ला घ्यावा.

 
 
 

Commenti


Subscribe Form

©2020 by Golgappa Story.

bottom of page